दि.१० सप्टेंबर,रोजी डहाणू, गंजाड सार्वजनिक सभागृहात तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक तसेच आज चौथ्या दिवशी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गंजाड यांच्या सौजन्यांने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
त्या शिबिरामध्ये डहाणू मधील छेडा रक्त पेढी तील कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्य घेऊन येऊन एकूण ३१ रक्तदान दात्यानी सहभाग घेऊन शिबीर यशस्वीरीत्या पार पडला. रक्तदान करणारे रक्तदान दात्यांना एक छत्री, नाश्त्याची सोय, फ्रुटी तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या शिबीरामध्ये मंडळाचे अध्यक्ष व गंजाड गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री अभिजीत देसक यांच्या व उपसरपंच श्री कौशल कामडी यांच्या संकल्पनेतून शिबीर आयोजित केले होते. या शिबीरामध्ये श्री गणेश मंडळ गंजाड,ग्रामपंचायत गंजाड, साई पालखी गंजाड, रिक्षा युनियन गंजाड यांचे सर्वांच्या प्रयत्नाने हे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.
या शिबिरामध्ये मंडळाचे उपाध्यक्ष भूषण भावर , हरेश प्रजापत , नितेश प्रजापत, योगेश राजा, प्रतिक दळवी, विपुल प्रजापत, गंजाड तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण वरठा, श्री सुदाम मेरे निकणे उपसरपंच आदी.कार्यकर्त्याचा सहभाग होता.
Discussion about this post