पांढरकवडा :- राज बहुद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने सतपल्ली येथे दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी उपचार व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या एक दिवसीय शिबीरामध्ये संधिवात,मानची व कंबरेची नस दबणे,मान अखडणे,गुडघे व कंबर दुखणे,हातापायाला मुंग्या येणे व बधिर पडणे,बि,पी,शुगर,आक्सिजन लेवल तपासणी इत्यादी तपासणी सकाळी १० ते सायकांळी ०४ वाजेपर्यंत सतपल्ली येथे करण्यात येणार आहे.
झरी तालुक्यातील व तेलंगाना काठावरील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राज बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राज लक्षट्टीवार यांनी केले आहे,आदिवासी बहुल असलेल्या नागरिकांचा उत्पनाचा आधार फक्त शेतमजूर असल्याने उपचार व रोगनिदान मल्टीस्पेशालिटी हास्पिटल मध्ये नामवंत डॉक्टर अंतर्गत सेवा घेणे शक्य नाही अथवा परवडत नाही,दरम्यान ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी संस्था कडुन १० ते १५ तज्ञ डॉक्टरचे निःशुल्क शिबीर घेत आहे विशेषतःकोणत्याही राजकीय पक्षाने आणि नागरिकांकडुन आतापर्यंत मदत सहकार्य न घेता असे ७० शिबीराचे आयोजित राज बहुद्देशीय विकास संस्थेकडून करण्यात आले आहे,
रुग्णांनी जूने रिपोर्ट इतर रूग्णाविषय कागदपत्रे घेऊन येणे असे संस्थेच्या संचालक कमिटी कडून आवाहन करण्यात आले आहे,रुग्णांनी शिबीरात येणा-आधी संस्थेच्या मुख्य कार्यालय मध्ये संपर्क साधावा असे आवाहन राज बहुद्देशीय विकास संस्थेकडून करण्यात आले आहे,
Discussion about this post