पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी व्युहरचनेतून दाखवला करिष्मा.
पाथरी (वार्ताहर) : – अहमद अन्सारि पाथरी परभणी
अखेर पाथरी बाजार समितीचा राजकीय संघर्ष टोकाला गेला माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्या पुढाकाराने त्यांच्या १२ संचालकांनी सभापती अनिल नखाते यांचेवर शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यावर शिक्कामोर्तब केले होते.पण दुसरीकडं सभापती अनिल नखाते यांनी केलेल्या व्युहरचनेच्या करिष्म्यातून माजी आमदार दुर्राणी यांचेकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने अविश्वास प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच बारगळला आहे.या अविश्वास खेळीत माजी आमदार दुर्राणी गट अपयशी ठरल्याची स्थिती शुक्रवारी पुढे आली आहे.
राजकीय घडामोडीनंतर सोमवारी गणपूर्तीअभावी तहकूब झालेली बाजार समीतीची सभा गुरुवारी झाली.या बैठकीत माजी आमदार दुर्राणी गटाच्या १२ संचालकांनी सर्व ठरावास विरोध केला.त्यानंतर माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी १२ संचालकांशी संवाद साधून उद्या शुक्रवारी सभापती अनिल नखाते यांचेवर अविश्वास प्रस्ताव दाखल करून फिरायला जाण्याचे ठरले होते.तर दुसरीकडं सभापती अनिल नखाते यांनी व्युहरचना आखुन दाखलेल्या करिष्म्यातून शुक्रवारी माजी.आमदार दुर्राणी गटाकडे अविश्वास ठराव दाखल करण्यास परेशे संचालक संख्या नसल्याने माजी आमदार दुर्राणी गटात मोठी अस्वस्थता पसरली आणि सभापती अनिल नखाते यांचेवर नियोजीत केलेला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी बारगळला आहे. या नाट्यमय राजकीय घडामोची शहरात चर्चा सुरु आहे.
▪️शाम धर्मे यांनी स्वतः चे उपसभापती टिकेल का याची काळजी करावी..
सभापती बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शाम धर्मे यांनी आता स्वतः चे उपभापती पद टिकेल का..?याची काळजी करण्याची गरज आहे.विरोधकांची अविश्वास प्रस्तावाची खेळीच अपयशी करण्यासाठी शिवसेना अल्पसंख्याकचे राज्य नेते सईद खान ,आमदार राजेश विटेकर,सर्व संचालक यांचे सहकार्य मिळाले.
अनिल नखाते
सभापती,बाजार समीती पाथरी.
प्रतिनिधी:-अहमद अन्सारी पाथरी परभणी7218275486.
[9/13, 5:33 PM] +91 72182 75486: नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अविश्वास आणण्याच्या खेळीत माजी.आमदार दुर्राणी गट अपयशी ठरताच याचा आनंदोत्सव बाजार समीतीत साजरा केला.यावेळी सभापती अनिल नखाते यांनी शिवसेना अल्पसंख्याक राज्य अध्यक्ष सईद खान यांचा सत्कार केला. समवेत माजी आमदार माणिकराव आंबेगावकर,जेष्ठ नेते मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे,नाना टाकळकर, असेफ खान,एकनाथ घांडगे,चक्रधर उगले,अशोकराव गिराम,इसुफोद्दीन अन्सारी आदी..
Discussion about this post