प्रतिनिधी:-अहमद अन्सारी.पाथरी परभणी. राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ( TET ) शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दि. 9/09/2024 पासून TET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली,परंतु यामध्ये डी.एड.,बी.एड, बी.ए. बी.एड./बी. एस.सी. बी.एड. च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना TET परीक्षा देण्यासाठी सुरुवातीला संधी दिलेली न्हवती, परंतु माझ्यासारख्या अनेक शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनी/एसएमएस आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना पण संधी उपलब्ध करावी.
हे परिक्षा परिषदेचे लक्षात आणून दिले आणि तशी मागणीही केली होती, सदरील मागणीचा विचार परिक्षा परिषदेने केला असून आता वेबसाईट वर डी. एड./बी.एड. आणि बी.ए./ बी.एस.सी. बी.एड.ॲपियर म्हणजे ज्यांचे शिक्षण अंतिम वर्षात चालू आहे.
अशा विद्यार्थ्यांनाही कालपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे वेबसाईटवर दिसत आहे, गेल्या नऊ तारखेपासून अशा ॲपिअर विद्यार्थ्यांचे मला सतत फोन येत होते, आता त्यांचा प्रश्न निकाली लागला असून अशा सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करून या संधीचे सोने करावे असे आवाहन प्रा. अमर शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे —————————————-
वरिल बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. ( प्रा. अमर शेख – प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पदवीधर संघटना तथा प्राध्यापक मोहंमद अली जोहर महीला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,औरंगाबाद 9405101034 )
प्रतिनिधी:-अहमद अन्सारी पाथरी परभणी7218275486.
Discussion about this post