: सुधीर गडपायले यांची मागणी
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना अर्धे अधिक सत्र संपले असतानाही गणवेश वितरित करण्यात आले नाही.
शिक्षण विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्याकरिता कापड पाठविले आहेत. मात्र शालेय गणवेश शिवण्याकरिता देण्यात न आल्याने सादर कापड शाळेत धूळखात पडले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश वितरित करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर गडपायले यांनी गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Discussion about this post