गेवराई तालुका मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना समिती मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून सिरसदेवी ग्राम पंचायतीचे सरपंच श्री. रविंद्र गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री. गजानन काळे आणि नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. शेख खाजा भाई यांची नियुक्ती करण्यात आली. आज जि.प.चे माजी अध्यक्ष श्री.विजयसिंह_पंडित यांनी कृष्णाई येथे श्री. रविंद्र गाडे, श्री. गजानन काळे आणि श्री. शेख खजाभाई यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक राधेशाम येवले, उपसरपंच कैलास पवार, संजय इंदानी, भैय्यासाहेब मगर, हरिभाऊ मोरे, दत्ता दाभाडे, धमपाल भोले, गजानन वेताळ, अमोल कदम, राजेंद्र पवार, कैलास कदम आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Discussion about this post