राहू प्रतिनिधी. मनीषा नवले
दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांच्या संकल्पनेतून व कै सुभाष अण्णा कुल मेमोरियल चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी बोरमलनाथ मंदिर बोरीपार्धी चौफुला येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
या महाआरोग्य शिबिरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
तरी सर्व नागरिकांनी या महा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान आमदार राहुल दादा कुल यांचे मध्यवर्ती कार्यालय केडगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आमदार राहुल कुल यांचे मध्यवर्ती संपर्क कार्यालय 70 38 66 77 99 या नंबर वरती संपर्क साधावा.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीब रुग्णांना शिबिरात मोफत उपचार होणार असल्याची माहिती आमदार राहुल दादा कुल यांनी दिली आहे.
Discussion about this post