मिरजेतील श्री गणेश विसर्जन मिरवणूक हि पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिकांसाठी दर वर्षी कुतूहलाचा विषय असतो लाखो नागरिक या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेत असतात यंदा विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद हा सण एकाच वेळी आल्याने जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी दि १९ रोजी जुलूस चे आयोजन करण्याचा स्वागतार्ह्य निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितूजी खोकर यांच्या आदेशाने तसेच मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक काढले असून यामध्ये गणेशउत्सव काळामध्ये आणि ईद साठी पार्किंग व्यवस्थेसह काही मार्गात बदल केले आहेत हे बदल पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ अनुसार प्रदान अधिकारांद्वारे आदेश क्रमांक जीविशा. गणेशोत्सव/पार्किंग आदेश/ ७१२२/२४ सांगली दि ६.०९.२०२४ रोजी सकाळी ७ वाजलेपासून १८.०९.२०२४ रोजीचे २०.०० पर्यंत मिरज मधील महाराणा प्रताप चौक ते बॉंबे बेकरी या मार्गावरील P१ P२ बाबतची अधिसूचना स्थगित करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे. तसेच दि १६.०९.२०२४ रोजीचे सकाळी १० वाजले पासून ते १८.०९.२०२४ रोजीचे १६.०० वाजेपर्यंत खालील ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद असेल.
*महाराणा प्रताप चौक* – महाराणा प्रताप चौकाकडे येणारे सर्व रस्ते …
*स्टेशन चौक* – मीरासो दर्ग्याकडे जाणारा रस्ता
*छत्रपती शाहू महाराज चौक* – मिरज शहर पोलीस ठाण्याकडे येणारे सर्व रस्ते
*फुलारी कॉर्नर* – फुलारी कॉर्नर कडे येणारे सर्व रस्ते
*बॉम्बे बेकरी*- या बेकरी कडे येणारे सर्व रस्ते
*किसान चौक* – महाराणा प्रताप चौक आणि मिरज शहर पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता
*श्री मैदान दत्त मंदिर चौक* – महाराणा प्रताप चौक कडे जाणारा रस्ता
*जवाहर चौक* – किसान चौकाकडे जाणारा रस्ता
*डॉ. एल आर भोसले चौक – पाटील हौदाकडून डॉ एल आर भोसले चौकाकडे जाणारा रस्ता
*झारी मशीद कॉर्नर*- बॉम्बे बेकरी कडे जाणारा रस्ता
*महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी कडे जाणारे सर्व रस्ते बंद असतील*
आता एक नजर नागरिकांच्या सोयीसाठी या काळात केलेल्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेविषयी
मिरज शहरात या काळात तासगाव फाट्याकडून येणारी सर्व वाहने सांगली कोल्हापूर कडे जाण्यासाठी तासगाव फाटा ते म गांधी चौक विश्रामबाग मार्गे सांगली आणि कोल्हापूर कडे (परतीचा मार्ग हाच असेल)
मालगाव टाकळी बोलवाड कडून येणाऱ्या वाहनांना कोल्हापूर कडे जाण्यासाठी दोन मार्ग असतील प[पहिला मार्ग – दिंडी वेस ते आळतेकर हॉल कमानवेस ओटू पार्क मार्गे कर्मवीर चौक ते म गांधी चौक मार्गे विश्रामबाग सांगली ते कोल्हापूर कडे (परतीचा मार्ग हाच राहील) आणि दुसरा मार्ग दिंडी वेस ते गाडवे पेट्रोल पंप – मंडले पेट्रोल पंप ते शास्त्री चौक मार्गे महात्मा फुले चौक ते कोल्हापूर रेल्वे उड्डाण पूल मार्गे कोल्हापूर (परतीचा मार्ग हाच राहील)
म्हैशाळ- बेडग- आरग कडून सांगली कोल्हापूर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुना नाका शास्त्री चौक म फुले चौक मार्गे कोल्हापूर ब्रिज
एम आय डी सी मधील वाहनांना कोल्हापूर कडे जाणारी वाहने अल्फोन्सा स्कुल ते रवा मैदा फॅक्टरी मार्गे विश्रामबाग सांगली कोल्हापूर कडे रवाना होतील तसेच कर्नाटक राज्यात जाण्यासाठी एम आय डी सी मेनन पिस्टन चौक तानंग फाटा तासगाव फाटा सुभाषनगर मार्गे कर्नाटक राज्य (परतीचा प्रवासही हाच राहील)
उत्सव काळामध्ये मिरज शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग ची सोय करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण- सांगली कोल्हापूर कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी
न्यू इंग्लिश स्कुल- मालगाव कवठेमहांकाळ कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी
मिरज हायस्कुल- आरग बेडग कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी
महात्मा फुले चौक- कर्नाटक आणि म्हैसाळ कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी
अण्णाभाऊं साठे पुतळ्यामागील रिकामी जागा- वाहनांची गर्दी झालेस इतर वाहनाच्या सोइ साठी पार्किंग व्यवस्था
अशा पद्धतीने सांगली जिल्हा पोलीस दलाने यंदा वाहतूक आणि पार्किंग साठी नागरिकांची सोइ केली आहे
Discussion about this post