मानवता हाच धर्म म्हणून पलुस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी वृद्ध महिलेला खाण्यास दिला स्वतःचा जेवणाचा डबा
महापूरानिमित्त स्थलांतरित झालेल्या वृद्ध महिलेच्या तब्येतीची विचारपूस करून, घडविले माणूसकीचे दर्शन
साधी राहणी व
उच्च विचारसरणी अंगिकारलेले तर तसेच नेहमी जनहिताचा विचार करणारे व पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची जबाबदारी निर्विवाद पणे सांभाळणारे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी अरविंद माने यांनी नुकतेच भिलवडी येथील महापुरानिमित्त स्थलांतरित वृद्ध महिलेला स्वताच्या जेवणाच्या डब्यातील जेवण खायला देवून
आपल्यातील माणूसकी व दानत दाखवून दिली.
शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलवडी सेकंडरी स्कूल येथे स्थलांतरित केलेल्या कुटूंबाची भेट घेऊन, त्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच गटविकास
अधिकारी अरविंद माने यांनी याठिकाणी असलेल्या एका साधारण
८०-८५ वर्ष असणाऱ्या वयोवृद्ध निराधार महिलेलाच्या तब्येतीची अगदी आपुलकीने
चौकशी करून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांना आपला जेवणाचा डबा खायला दिला. त्यांचे हे काम निश्चितच वाखाण्याजोगे आहे व माणुसकीला साद घालणारे आहे.
सध्या माणूसकी हरपत चालली असताना, अशा परिस्थितीत पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने यांनी या ठिकाणी वृद्धेची आपुलकीने चौकशी करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
प्रतिनिधी – रविंद्र सनके
Discussion about this post