वणी येथील प्रसिद्ध कवी प्रा.डॉ. अनंता सूर यांची ‘काटेरी पायवाट’ हे आत्मकथन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित १९४५ साली स्थापन झालेले आणि युजीसी नॅक मूल्यांकनात ‘ए प्लस’ दर्जा बहाल करण्यात आलेले प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांनी शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून एम.ए. प्रथम वर्ष मराठीच्या MAR-EC 571 आत्मचरित्र लेखनाचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेत दुसऱ्या सत्रासाठी अभ्यास मंडळाने निवडून अंतिम मंजुरी दिली आहे.या आत्मकथनावर अकोला येथील डॉ . अनिलकुमार दडमल यांनी “काटेरी पायवाट आकलन आणि आस्वाद” हा महाराष्ट्रातील ३३ नामवंत प्राध्यापकांचे लेख असलेला ग्रंथ संपादित केलेला आहे.
Discussion about this post