





देशाची सांस्कृतिक – ऐतिहासिक, स्वातंत्र्य संग्रमात अग्रगन्य,सामाजिक चळवळी, समाजकार्य आदीची राजधानी म्हणजे पुनवडी अर्थात ….. 🚩🇮🇳पुणे 🇮🇳🚩
छत्रपती शिव-शंभु च्या जन्माने व धग धगत्या इतिहासाने, अवघ्या जगाला भुरळ घालणारी संस्कृती, सणसोहळे,आणि नव्याने ओळख झाली आहे ती IT Hub….
सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाज एकत्र यावा, विचाराचे आदान प्रदान व्हावे,अन्याय अत्याचारा विरुद्ध सामूहिक आवाज वाढवा,नव समाज निर्मिती व्हावी यासाठी सुरवात झाली.
पुण्यातील गणेश देखावे पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय अक्षरशः ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहा सारखा वर्षा गणिक वाढतच आहे.
आणि हे फक्त आणि फक्त पुण्यातच घडू शकते की पुणेकर पुणे पंचक्रोशीतील, इतर जिल्यातील राज्यातील नव्हे तरी परदेशातूनही कुटुंब पुण्याचा गणेशउत्सव पाहायला ये असतात आणि ते अगदी पहाटे पर्यंत गर्दीचा महापूर दर वर्षी वाढतच आहे तोही कुठली अपदा न येता, पुणे पोलीस, ग्रामीण पोलीस,
होमगार्ड, एन सी सी,एन एस एस व स्काउट चे विदयार्थी या साठी तत्पर असतात त्यांच्या सेवेला पुणेकर नागरिकांचा सलाम!…
यासोबत आपण पुणेकर नागरिकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, आपण सर्वांनी पहिले असेल यंदा आणि मागील काही वर्षा पासून एक वेगळीच परंपरा पुढे येत आहे ती म्हणजे फेलक्स, ठरविक एकाच्या अट्टाहासाठी पुणे मानपाने हा असा अघोरी कार्यक्रम बंद करावा, याला परवानगी आहे की नाही.
हे कुणी पहिले आहे पण हे थांबले पाहिजे. पुण्याची अगदी दुरावस्था केली आहे. शनिवार वाडा, लाल महाल, नाना वाडा, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा आदी वास्तू ढाय मोकलून रडत असतील की आमचा पराक्रम या लाल फेलक्स ने नेस्त नाही झाले म्हणजे मिळवली.
एकही राजकारणी वा पक्ष याविषयी ब्र शब्द काढायला तयार नाही, ही ही आहे का आपली परंपरा, रूढी का ती आपण पुसून टाकायला निघालो आहे तेही कुणा एका परप्रांतीया साठी, हो परप्रांतीय च म्हणावे लागेल…..
विचार करा की हे पुढच्या वर्षी बदलले पाहिजे..
Discussion about this post