पट्टणकोडोली(हातकणंगले तालुका प्रतिनिधी):-
छत्रपती शिवाजी म्हटलं की अंगामध्ये सळसळणाऱ्या नसाप्रमाणे एक धगधगता ज्वलंत उदाहरण म्हणजेच विशालशैल्य विशाळगड. 1600 च्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये आजही दिमाखात उभे असलेल्या गडकिल्ल्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हे एक जिवंत उदाहरण आहे. आजच्या युगामध्ये याच विशाळगडाची दयनीय अवस्था दाखवण्यासाठी मंडळान विशेष प्रयत्न केले आहे.
याच विशाळगडाने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचविला होता, पण आजच्या युगामध्ये इतिहास जमा झालेल्या या विशाळगडावरती मध्य धुंद अवस्थेत असलेली पिढी जल्लोष मांसाहार नवस तसेच सहली या नावाखाली संपूर्ण विशाळगड नासवत आहेत.
पशु पक्षांची बळी देणे व उरूस साजरा करणे अशा प्रथा या विशाळगडावरती आज पाहायला मिळतात यालाच वाचा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक पट्टणकोडोली यांच्याकडून एक ऐतिहासिक सजीव देखावा साजरा केला जात आहे.
ऐतिहासिक देखाव्याची परंपरा जपणारे हे मंडळ गणराया आवड विजेता तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा व इतिहास ज्वलंत ठेवणार्या मंडळांपैकी एक आहे. समाज प्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपत वृक्ष संवर्धन, डोळे तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, ऐतिहासिक ग्रंथांचे वाटप, भव्य महाप्रसादाचे आयोजन, पूर परिस्थिती वरती निष्पक्ष कामगिरी असे अनेक कार्यक्रम करत ऐतिहासिक देखाव्याचा वारसा जपणाऱ्या या छत्रपती शिवाजी चौक पट्टणकोडोली मंडळामुळेच नवीन पिढीला व लहान पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून पाहता येतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल निष्ठा असणाऱ्या या मंडळाला गावातील व पंचक्रोशीतील गणेशभक्त व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. मंडळांने या ऐतिहासिक कार्यक्रमावेळी बसण्यासाठी स्त्रियांना व पुरुषांना बैठक व्यवस्था अत्यंत सुलभ पद्धतीने व प्रकाशमान वातावरणामध्ये केली आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री धुळा रामाण्णा, प्रगतशील शेतकरी प्रकाश काका पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव साहेब, राज्य कार्यकारिणी मंडळाचे सदस्य श्री शिवाजी मुरलीधर जाधव दादा, नौशाद भाई शिकलगार, रमेश मेजर व ज्ञात अज्ञात सर्व देणगीदार मदतनीस यांचे मंडळाला विशेष सहकार्य लाभले अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व कलाकार यांनी दिली.
Discussion about this post