आज बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित नेहमी दूरचित्रवाणीवर दिसणारी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस प्रत्यक्षात आज मिरज रेल्वे जंक्शन वर अवतरली आणि नागरिकांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोल्हापूर-मिरज-पुणे, पुणे-मिरज-हुबळी तसेच देशातील अन्य चार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचा ऑनलाईन सेवेद्वारे शुभारंभ करण्यात आला.
मिरज जंक्शन आणि सांगली रेल्वे स्थानकावर राज्याचे कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांच्यासह सांगली चे आमदार सुधीर दादा गाडगीळ जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी सौ पूजा विशाल पाटील भाजप नेते मकरंद देशपांडे रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, शेखर इनामदार रेल्वे प्रवासी संघाचे ऍड ए ए काझी जहीर मुजावर रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे माजी महापौर संगीता खोत यांच्यासह मान्यवरानी कोल्हापूर-मिरज-पुणे व पुणे-मिरज-हुबळी या ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत केले व पुढील प्रवासासाठी या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. लवकरच कोल्हापूर मुंबई वंदे भारत सुरु होणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी नुकतेच केले आहे यामुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.
Discussion about this post