शिरोळ प्रतिनिधी / स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अधिकार सार्वभौमत व लोकशाही गणराज्य समाजवाद धर्मनिरपेक्षता यावर आधारित असणारे भारतीय संविधान हा विकसित देशाचा पाया आहे.
संविधानामुळे भारतीय जीवन हे सुखकर तसेच विकसित होणार त्यामुळे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात उत्तम राज्य घटना आहे.
भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असून यांनी देशाच्या प्रगतीस सुरुवात राज्यघटनेने झाली.
असे प्रतिपादन ऍड ममतेश आवळे यांनी शिरोळ येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शिरोळ येथील संविधान मंदिराचे उद्घाटना वेळी ते बोलत होते.
राज्यात 434 आयटीआय कॉलेज मध्ये संविधान मंदिराची स्थापन झाले. ऍड आवळे यांनी असल्याचे सांगितले.यावेळी संस्थेचे चेअरमन एन. डी. दिसले, प्राचार्य मेघना जोशी, प्राचार्य अविनाश लोहार, अजित हिरगुडे, सुशांत सावंत, सह कर्मचारी विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post