टिटवाळा रेल्वे स्थानकातील समस्यांचा पाढयाने रेल्वे प्रवासी त्रस्त…..
रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक पवित्र्यामध्ये- विजय देशेकर
टिटवाळा (कल्याण ) : प्रफुल्ल शेवाळे
कल्याण कसारा मार्गांवरील मध्य रेल्वेचे टिटवाळा रेल्वे स्थानक एक महत्तवाचे रेल्वे स्थानक म्हणून प्रसिद्ध आहे.. टिटवाळा परिसरातील प्रसिद्ध असे प्राचीन महागणपती च्या दर्शना करिता अनेक भाविक राज्याच्या विविध भागातून येथे येत असतात…
टिटवाळा परिसरातील दैनंदिन चाकरमानी प्रवाशांच्या रेल्वे प्रवासातील टिटवाळा स्थानका संदर्भातील विविध समस्या, स्थानक स्वच्छता विषय,समाज माध्यमातून तर काही प्रत्यक्ष भेटीत दिसून येते होत्या. परिसरातील रेल्वे प्रवासी टिटवाळा स्थानकाच्या सुख सोयी च्या अभावाने अक्षरशः त्रस्त आहेत.
या अनुषंगाने दि .१६ सप्टेंबर रोजी कल्याण कसारा कर्जत(K3) रेल्वे प्रवासी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष विजय देशेकर यांच्या मार्फत संबंधित स्थानिक अधिकारी,टिटवाळा रेल्वे स्टेशन प्रबंधक श्री.सिंग ,RPF PSI श्री.मराठे ,CTI यादव ,रेल्वे IOW विभागाचे अहिरराव ,जयराम यांची स्टेशन प्रबंधक यांच्या दालनात टिटवाळा स्थानक परिसरातील समस्या विषयी खोलवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने स्टेशनबाहेरील तिकिट ऑफीससमोरील रस्ता त्वरीत नव्याने बनविण्याबाबत संबंधित गती शक्ती विभागाशी तात्काळ फोनवर बोलणे करुन येत्या १० ऑक्टोंबर पर्यंत हा रस्ता मार्गी लावण्या संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.
त्याच बरोबर नियमित पणे स्टेशन परिसर,तसेच तिन्ही जिन्यांची साफसफाई करावी व गेले वर्षभरापासुन लिफ्टचे काम सुरु आहे ते त्वरीत पुर्ण करुन ती लिफ्ट सुरु करुन जेष्ठ नागरीकांना दिलासा द्यावा अशा सूचना रेल्वे प्रवासी संघटने च्या वतीने करण्यात आल्या आहेत .
याचसोबत रेल्वे प्रशासनला KDMC बाबत कचरा व ड्रेनेज व्यवस्थेबाबत सहकार्य करुन देण्यासाठी KDMC उपायुक्तांना ताबडतोब फोन करुन सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसेच उद्यापासुन घंटागाडी नियमित पणे सुरु होइल अशी व्यवस्था केली आहे.बहुतांश टु व्हिलर वाल्यांच्या तक्रारीने पार्किंगवाल्याची लुट देखील उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन देऊन त्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश द्यावे ही अग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे .
टिटवाळा परिसरातील सर्व रेल्वे प्रवाश्यांना k3 रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येते आहे कि आपल्याला रेल्वे तसेच पार्किंग बद्दल काहीही समस्या असल्यास आम्हाला तात्काळ कळवावे.
टिटवाळा रेल्वे स्थानकाचे रूप बदलणे आणि समस्या निकाली लावण्यासाठी रेल्वे व्यवस्थापक यांची सुद्धा तेवढीच मोलाची जबाबदारी आहे असं मत विजय देशेकर यांनी म्हटलं आहे. अन्यथा आमच्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातुन्, लोकशाही च्या मार्गाने एका आक्रमक भूमिका आम्हाला हाती घ्यावी लागेल असा इशारा विजय देशेकर यांनी दिला आहे.
यावेळी टिटवाळा परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख किरण पाटील,अशोक चौरे,उपविभागप्रमुख नितिन सिंग,अनिल विश्वासराव,रेल्वे प्रवासी अनिल राजभोर,वाघुळकर काका उपस्थित होते.
Discussion about this post