पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुणे शहर व नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा…
कैलास झेंडे- पुणे शहर प्रतिनिधी
सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 90% भरले असून पानशेत, टेमघर, पवना हे धरणे सुद्धा 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त भरलेली आहेत. त्यातच हवामान विभागाने पुणे व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दर्शविला आहे. सध्या खडकवासला धरणांमधून 27000 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
तसेच मुळशी मधून सुद्धा 30000 क्युसेस पाण्याच्या विसर्ग सोडलेला आहे, तरी पुणे शहरातील सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल, विश्रांतवाडी, बालेवाडी, बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. कृपया सर्व नागरिकांनी हे आवाहन गांभीर्याने घ्यावे, कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही, याबाबत योग्य ही खबरदारी घ्यावी. महापालिकेच्या सर्व टीम्स ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत आहे त्या त्या ठिकाणी सतर्क केलेल्या आहेत, व सर्व टीम योग्य रीतीने तयार आहेत…
सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आव्हान डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
आपत्कालीन काळातील फोन नंबर खालील प्रमाणे
Discussion about this post