(किर्लोस्करवाडी) रामानंदनगर महाविद्यालय शेजारी रेल्वे पादचारी भुयारी मार्ग होणे बाबत मा.सुकुमार पाटील साहेब रेल्वे सल्लागार समिती यांना निवेदन देण्यात आले
➖➖➖➖➖➖➖
रेल्वे लाईनमुळे रामानंदनगरचे पूर्वभाग व पाश्चिमभाग असे दोन भाग झाले आहेत. रेल्वे लाईनचे पश्चिमेस महाविद्यालय, स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनि. कॉलेज, कन्याशाळा आणि जिल्हा परिषद शाळा नं. ३ अशा शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थेत सुमारे २५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पैकी ६०% विद्यार्थी रेल्वे लाईनच्या पूर्व भागांतून येत असतात.
तसेच याच भागांतील ज्येष्ठ नागरिक, सर्व बंधू-भगिनींना ग्रामपंचायत, बँका, पतपेढ्या, सरकारी न खाजगी दवाखाने इ. रेल्वे लाईनच्या पूर्व-भागांत आहेत. सर्व नागरिकांना विविध कामासाठी रेल्वे लाईनचे पूर्वेस व पश्चिमेस ये-जा करावी लागते.
सध्या ही रहदारी रेल्वे-गेट नं. ११२ मधून होत आहे. परंतु भविष्यांत हे ११२ नं. रेल्वे गेट बंद होणार असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणांत गैरसोय होणार आहे तरी सर्वांच्या सोईसाठी महाविद्यालयाचे शेजारी एक पादचारी भुयारी मार्ग व्हावा. असे केल्याने विद्यार्थी व नागरिकांची फार मोठी सोय होणार आहे
तरी आपण वरील बाबींचा विचार करून विद्यार्थी व नागरिक यांची सोय होईल असे निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष पलुस तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा रविंद्र सनके व बहीण लाडकी समिती पलुस – कडेगाव अध्यक्ष दिपक मोहिते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते….
Discussion about this post