
नायगाव न्यायालयात दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन….
नायगाव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर….
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण नांदेड व तालुका विधिसेवा प्राधिकरण नायगाव यांच्या तर्फे दिनांक २८.०९.२०२४ रोजी नायगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीजास्त प्रकरणांत आपसी तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहान प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष नायगाव बा. यांनी केले आहे.
सदर लोकन्यायालयात दाखल पुर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत पाणी देयक, विविध बँकाची कर्ज वसुली प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
तसेच या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जुनी व नवीन तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबीक हिंसाचार व खावटी, चेक अनादर इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत, तरी सर्व पक्षकारांनी / संबंधीतांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहान श्रीमती ए.टी. गित्ते, दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकअदालती मध्ये निकाली निघालेल्या प्रकरणात १०० टक्के कोर्ट फिस परत मिळते तसेच जलद, सुलभ व मोफत न्याय मिळतो.
सर्व संबधीतांनी लोकन्यायालयात येताना आपले ओळखपत्र आणने आवश्यक आहे….
Discussion about this post