पांढरकवडा :- शहरात फुटबॉल खेळाला चालना मिळावी व फुटबॉल हा खेळ सुद्धा प्रचलित व्हायला हवा व शहरातील विविध खेळाडू फुटबॉल खेळामध्ये सुद्धा तयार होऊन जिल्हा स्तरावर,विदर्भ स्तरावर,राष्ट्रीय स्तरावर पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून शहीद भगतसिंग क्रिडा मंडळा तर्फे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत
.पांढरकवडा येथे दि.२१ व २२ सप्टेंबर पासून शहीद भगतसिंग क्रिडा मंडळा तर्फे प्रथमच फुटबॉल U१७ व U१४ चे सामने आयोजित करण्यात येत आहेत.या सामन्यांत U१७ चे प्रथम पारितोषिक ०७ हजार रुपये व द्वितीय पारितोषिक ०५ हजार रूपये तसेच U१४ चे प्रथम पारितोषिक ०५ हजार रुपये व द्वितीय पारितोषिक ०३ हजार रुपये आणि वैयक्तिक बक्षिसे बेस्ट प्लेयर,
बेस्ट गोल कीपर,बेस्ट डिफेन्डर सुद्धा ठेवण्यात आले आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ २१ सप्टेंबर सकाळी १० वाजता होणार असून या स्पर्धेचे उदघाटन घनश्याम राठोड (जिल्हा क्रिडा अधिकारी) यांच्या हस्ते होणार आहेतत.तसेच या स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहरातील (ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक) मदन जिड्डेवार,तसेच प्रमुख उपस्थिती दिनेश झांबरे (पोलीस निरीक्षक पांढरकवडा),राजू मोट्टेमवार (नायब तहसीलदार),
सुनील कोपुलवार (तालुका क्रीडा संयोजक),राजू तोडसाम(माजी आमदार),नितीन मडावी (प्रदेश महामंत्री आदिवासी आघाडी),गजु बेजंकीवार (माजी बांधकाम सभापति जी.प.यवतमाळ),बाळू मोघे,सोनू बोरेले,अंकीत नैताम,अतिश चव्हाण,बंटी जुवारे,चंद्रकांत पेटेवार इ.तसेच या स्पर्धेत स्पर्धांकांसाठी राहण्याची व्यवस्था जीड्डेवार भवन,भोजनाची व्यवस्था जगदंबा संस्था केळापुर व गजु बेजंकीवार तर्फे करण्यात आली आहे.तसेच विजयी संघाना खेतानी फाऊंडेशन तर्फे ट्रॉफी देण्यात येईल.या स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे च्या हस्ते करण्यात येईल.
Discussion about this post