मांडवगण फराटा : विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने चाललेल्या ट्रक ने कामाला चाललेल्या महिलेला उडवले.पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा येथे आज बुधवारी सकाळी ८ वाजता घडली. ता – हावेली. कुंजीरवाडी. दिनांक १८/०९/२०२४ रोजी ही घटना घडली.
महिलेचे नाव
नंदा दत्तात्रय धुमाळ ( वय ४५ ) रा. धुमाळ मळा. कुंजीरवाडी. ता.हवेली.माहितीनुसार कळलेल्या जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे
ही घटना कशी घडली
रोजच्या प्रमाणे कामाला सकाळी जात असताना.आपल्या दोन सहकारी यांच्या बरोबर बसची वाट बघतांना. अगदी ह्याच दिवशी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकिमुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थेऊर फाटा येथे बंद करण्यात आली होती. ह्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी खूप प्रचंड झाली होती.अगदी ह्याच वेळी नंदा धुमाळ बसची वाट बघत असताना. विरुद्ध बाजूने भरधाव वेगात येत असलेला ट्रक नंदा धुमाळ यांच्या दोन्हीं पायांवर ट्रकचे चाक गेले.
कसे वाचवले जखमी महिलेला
नेहमी प्रमाणे व्यायाम करून घरी निघालेले कुंजीरवाडीचे सरपंच यांनी त्या जखमी महिलेला पाहिले.लगेच अंग्निशामक दलाचे जवान सुखराज खंडेराव दाभाडे यांच्या मदतीने एक रिक्षा बोलवून तत्काळ विश्र्वराज हॉस्पिटल येथे प्रथम उपचार करून पुढे डी. वाय.पाटील रूग्णालयात पाठवण्यात आले.
एक देवदूत
जखमी असलेल्या महिलेला उपचाराची गरज होती. वैद्यकीय मदत योग्य वेळी मिळाली नसती तर काहीही झाले असते. अशा योग्य वेळी दोन देवदूत पुढे आले. व वैद्यकीय मदत मिळवून दिली.अशा प्रकारच्या सेवेमुळे सरपंच साहेब चर्चेत आले आहे.असेही समजले आहे की सरपंच साहेब बऱ्याच वर्षापासून अनेकांना मदत करीत आहे.
Discussion about this post