विराज शिंदे यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात विनोदातून प्रबोधन
९ दिवसात १६ यशस्वी शो हजारो महिला सहभागी
रांजणगाव गणपती: प्रतिनिधी
गणेशोत्सव निम्मित सरकार फिल्म्स प्रस्तुत कोण जिंकणार पैठणी या कार्यक्रमाचे नऊ दिवसांत सोळा सुपरहिट शो झाले.
आई जगदंबा व महागणपतीच्या कृपाशिर्वादाने, मित्रपरिवाराच्या साथीने आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादाने व प्रेमाने शक्य झाले त्याबद्दल त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमात आजीबाईंचा फॅशन शो तर वहिनींचा मेकअप गेम आकर्षक ठरला. मुलांना प्रश्न विचारुन अभ्यासाचा सल्ला दिला. दिवसभर शिणलेल्या माता भागिनिंसाठी एक दिवस अतिशय आनंद, व उत्साह निर्माण करणारा ठरत होता.
महाराष्ट्रभर गाजत असलेला आणि सर्व महिला वहिनींना आवडणाऱ्या कार्यक्रमाच गावोगावी व आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी कौतुक केले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधे तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, आंबळे, मुखई तेसेच खेड, हवेली, दौंड तालुक्यामध्ये व अहिल्यानगर येथे कानडे वस्ती या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
नवरात्री साठी बुकिंग सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना विराज शिंदे सरकार यांनी सांगितल.
“होम मिनिस्टर सरकार फिल्म्स प्रस्तुत कोण जिंकणार पैठणी” चे शिवव्याख्याते विशाल मराठे राजरत्न हणूवते, कुणाल वर्पे, ऋषिकेश दिघे, धनश्री गवारे, सिद्धार्थ कांचन या टिमवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post