मेळघाट विधानसभा क्षेत्र पदाधिकार्यांच्या बैठकीत एकमुखी निर्धार
आगामी मेळघाट विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार) भूमिका ठरविण्याच्या द्रुष्टीने *धारणी व चिखलदरा तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक १३ सप्टेबर ला दुपारी १ वाजता शासकीय विश्रामग्रुह धारणी येथे आयोजित केली होती.राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या पदाधिकारी बैठकीला प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते ॲड.संजय भोंडे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनील कीर्तकार,अल्पसंख्यांक विभागाचे श्री
मोहम्मद स ईद,धारणी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.सुधीर पटेल,चिखलदरा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.रामलाल काळे,मेळघाट विधानसभा अध्यक्ष श्री.सुरेश ईंगळे,महिला विधानसभा अध्यक्षा कु.ललिताताई बेठेकर,चिखलदरा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ईस्माईल भाई,धारणी शहर राकाॅ अध्यक्ष हावरे सौदागर,अनारसिंग रावत,वासुदेव मालवीय आदी मान्यवर प्रामुख्याने ऊपस्थित होते.
मेळघाट मतदार संघ राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्याच वाट्याला येणार असून या मतदार संघात यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्याकरीता समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील असा ठाम निर्धार यावेळी ऊपस्थित पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेश
या बैठकीमध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यातील भाजप,प्रहार सह इतरही पक्षाच्या अनेक पदाधिकार्यांसह. काही सरपंच व सदस्यांनीही राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे संजय काकोडे, काजलडोहचे दरपंच फुलेसिंग उईके ग्रा.पं.सदस्य,मा. प्रदीप कोगे ग्रा.पं.सदस्य भिरोजा,मा.जव्हारलाल मावस्कर घोटा, मा.नारायण जांबेकर तलाई,मा.नंदलाल धांडे, मा.भुरिया सावलकर, मा.भैयालाल मावस्कर, मा. राजेश कासदेकर,मा. रमेश सावलकर, मा.सतीष बेठेकर,मा. सुधीर सेलेकर,मा.दिनेश दारसिंबे,मा. गंगाराम सावलकर, मा.अनिल दारसिंबे, मा.मंजू सावलकर आदींचा समावेश होता.
आजच्या बैठकीला धारणी व चिखलदरा तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते.
Discussion about this post