राहू प्रतिनिधी. दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी असून मी गेल्या दहा वर्षात आरोग्य कामासाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी सांगितले. ते तालुक्यातील चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या दरम्यान बोलत होते.
यावेळी आमदार राहुल दादा कुल म्हणाले की स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना दौंड तालुक्याचा आमदार झाल्यापासून आरोग्याच्या बाबतीत काम करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा वर्षात आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम करण्यात मला माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने यश आले आहे.
तसेच कोरोना कालावधीत आम्ही मोठे काम उभे केले परंतु त्याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. यापुढील काळात देखील आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.या शिबिरात सुमारे 13 हजार रुग्णांची नोंदणी व तपासणी झाली असून तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबिर आहे.
पुण्यातील 50 हून अधिक नामांकित हॉस्पिटलने या शिबिरात सहभाग नोंदवला.तसेच 3000 पेक्षा जास्त लोकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.800 हून अधिक दिव्यांगाना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रंजनाताई कुल, कांचन ताई कूल, प्रेमसुख कटारिया, नामदेव नाना बारवकर, माऊली ताकवणे, धनाजी शेळके, हरिभाऊ ठोंबरे,धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख,प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी केले तसेच प्रास्ताविक डॉक्टर दीपक जाधव यांनी केले व आभार उमेश देवकर यांनी केले
Discussion about this post