रानटी हत्ती चा कळप सिर्सीत…
17 सप्टेंबर…
मंगेश सहारे सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी
वैरागड..कुरखेडा तालुक्यात गत महिनाभर धान पिकाची नासाडी केल्यानंतर रानटी हत्ती ने आपला मोर्चा वळविला.
या हत्ती नी वैरागड परिसरातील चामोर्शी चक येथे एका शेतकऱ्याच्या शेतात 17 सप्टेंबर रोजी ठिय्या मांडून धान पीक तुडवले नासधूस केली, हे दृश्य ड्रोन कॅमेराने टिपल्यानंतर सोशल मीडियावर वायरल झाली.
सध्या हा कळप सिर्सी -देऊळगावच्या जंगलात आलेला आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागडच्या चामोर्शी चक येतील शेती शिवारात 28 हत्ती चा कळप 17सप्टेंबर च्या रात्री धान पीक तुडवीत असताना वनविभागाच्या लोकेशन मध्ये आढळून आले. मागील वर्षी 22 हतीच्या कळपाने या भागात खरीप हंगामात धुमाकूळ केला होता.
मागील 4 ते 5 दिवसापासून वैरागड परिसरात हत्ती चा वावर आहे. आता या हत्ती नी चामोर्शी चक ओलांडून खोब्रागडी नदी ओलांडली सध्या हा कळप आरमोरी तालुक्यातील सिर्सी ~देऊळगाव जंगलात वावरत आहे.
Discussion about this post