कोल्हापूर प्रतिनिधि/ ऐतिहासिक बिंदू चौकात महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून ते बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत. या चौकात राजकीय धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकेने सन 2013 मध्ये केलेला आहे. तरीही महानगरपालिकेच्या दुर्लक्ष ते मुळे या चौकाचे विद्रूपीकरण होत आहे.
म्हणून संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीने हे विद्रूपीकरण थांबवण्यात यावे म्हणून अनेक वेळा महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा निवेदने दिलेली आहेत. तसेच नगरपालिकेच्या लक्षात आणून देण्याचे काम हे कार्यकर्ते करीत आहेत. दि. 03/ 09/ 2024 रोजी संविधान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सुमारे 3 ते 4 तास विनंती करत होते.
तरीही नगरपालिकेच्या कोणत्याही सक्षम अधिकारी तसेच आयुक्त यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दारात होते. त्यावेळी आयुक्त हे गाडीतून बाहेर निघाले होते. तरीही कार्यकर्त्यांनी हात जोडून विनंती केली तथापि त्यांचे निवेदन आयुक्तांनी स्वीकारले नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी संविधानिक आंदोलनाची भूमिका घेत आयुक्त यांची गाडी अडवली होती. म्हणून मागासवर्गीय आंदोलकांवर कोल्हापूर महानगर पालिकेच्या वतीने जाणून बुजून गुन्हे दाखल केले आहेत.
याची चौकशी होऊन आयुक्त के. मंजू लक्ष्मी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या वरती SC/ST Act गुन्हे दाखल झाले पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आम सभेत 2013 साली बिंदू चौकाचे विद्रूपीकर थांबवण्याचा केलेला राबवू न शकणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांची चौकशी होऊन तात्काळ निलंबन करावे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक बंधू चौकाचे विद्रूपीकरण होऊ नये याकरिता बिंदू चौकात कोणतेही राजकीय, धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी बाबतचा 16/2013 चा ठराव क्र.197 सका. क्र 11 महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. तरी या केलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता 2017 पासून संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. तरीही नगरपालिका जाणून बुजून या कायद्याची अंमलबजावणी करत नाही.
अनेक मंडळाच्या वतीने धार्मिक उत्सव तसेच राजकीय कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्रूपीकरण होत आहे. हे थांबवा म्हणून संविधानिक मार्गाने केलेल्या आंदोलकांवर महानगरपालिकेने जातीय मानसिक तेथून दाखल केलेले गुन्हे तत्काळमागे घ्या अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा सतीश माळगे यांच्या वतीने देण्यात आला व अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
Discussion about this post