
प्रतिनिधी एरंडोल – नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्य अधिकारी किरण देशमुख यांची प्रशासकीय कारणास्तव रिक्त जागेवर ओझर नगरपरिषद येथे मुख्य अधिकारी म्हणून अवघ्या दीडच महिन्यात बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी किरण देशमुख यांची २५ जुलै २०२४ रोजी एरंडोल नगरपालिकेत रिक्त असलेल्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती परंतु
अवघ्या ५५ दिवसात त्यांची प्रशासकीय कामाचे कारण देत ओझर येते बदली झाल्याने शहरात चर्चेला उधाण आलेले आहे कारण शहरात अशी चर्चा आहे की मुख्य अधिकारी किरण देशमुख हे काही राजकीय लोकांच्या मर्जीतले असल्याने त्यांची नियुक्ती एरंडोल
नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी पदी तिसऱ्यांदा झाल्याचे देखील वृत्त आहे तसेच सदर अधिकारी राजकीय पुढार्यांच्या मर्जीतले असून देखील त्यांची तडका फडकी बदली झाल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून निरनिराळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Discussion about this post