
पाळधी शहर (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे येथील शेकडोहून अधिक तरुणांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आज गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे या गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले.एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून याला तळा जाणार नाही.
यातील बरेचसे कार्यकर्ते हे भिल्ल समाजाचे असून ज्या गावात भिल्ल समाज आहे तेथे एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच पुढच्या काळात त्यांच्या वस्तीचा विकास करणे,लाडकी बहीण योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविणे, संजय गांधी निराधार योजना अशा सर्व गोष्टींचा लाभ देण्याकरिता आमचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.
प्रतिनिधी :- राकेश धनगर
बातम्या व प्रतिनिधी :-८२०८५३६८७७/७७९८९४९१३६
Discussion about this post