बातमी सविस्तर
मांडवगण फराटा येथे बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी लांबून वाडीवस्ती.रानात राहणारे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.लांबून येणारे विद्यार्थी साठी काहीच सोय नसते.काही ईलाज नाही म्हणून काही शाळकरी विद्यार्थी घरातील मोटार सायकलवर येतात.
* नियमांचे पालन न करणे
कायद्यानुसार १८ वर्ष खालील विद्यार्थी यांना मोटारसायकल चालवणे बंधन कारक आहे.याची काळजी पालक वर्ग घेत नाही.शाळेत सोडवणे हे सुज्ञ व्यक्तीचे काम आहे. पालकांना काम असल्याने विद्यार्थी स्वतःहा मोटारसायकल घेऊन येतात.
* शाळेतही नियम असावे
असे विद्यार्थी वाहन घेऊन येत असतील तर त्याची चौकशी व्हावी. पालकांना सांगण्यात यावे.शिक्षण महत्वाचे आहे.हे पालकांनाही कळावे. याचे योग्य वेळी सांगण्यात यावे.लहान विद्यार्थी यांनी वाहन चालू नये याचे काटेकोर नियम पाळावे.
शाळेतून सरकारी योजनांतून विद्यार्थी यांना सायकल मिळवण्याचे प्रयत्न करावे.
* आर्धी शाळा
आज नाग पंचमी असल्याने शाळेतून विद्यार्थी यांना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारे सोडण्यात आले.हे दोन बहीण भाऊ मोटार सायकल वर आपल्या घरी निघाले असता. मांडवगणमधून जवळ जवळ दोन अडीच किलमीटर वर आंगणवाडी च्या काही आंतरा वर
MH 42 BF 3132 अशोक लेलँड टेम्पो व मोटार सायकल MH 12 EG 5174 ह्या दोघांचा अपघात झाला.यात विद्यार्थी श्रावणी देविदास थोरात ( वर्ग ९ वी) व तिचा भाऊ निरंजन देविदास थोरात (वर्ग ६ वी ) याचा अपघात झाला.यात विद्यार्थी श्रावणी देविदास थोरात हिचा जागेच प्राण गेले. व तिच्या भावास पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवले.
मिळवलेल्या माहितीनुसार……
Discussion about this post