• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

by
February 14, 2026
in Blog
0
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी-

पोलीस अधीक्षक कार्यालय,लातूर. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस यांच्या धोरणानुसार डिजिटल प्रणालीचा अवलंब करून भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

बायोमेट्रिक प्रणाली चा वापर उमेदवारांची अचूक पडताळणी भरती प्रक्रियेच्या प्रारंभी प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक नोंदणी (फिंगरप्रिंट रेकग्निशन) करण्यात येते. मैदानी चाचणीवेळी नोंदवलेली बायोमेट्रिक माहितीलेखी परीक्षेदरम्यान पुन्हा पडताळली जाते यामुळे मैदानी चाचणी देणारा उमेदवार आणि लेखी परीक्षेला उपस्थित राहणारा उमेदवार तोच असल्याची खात्री संगणकीय पद्धतीने केली जाते त्यामुळे गैर प्रकारांना पूर्णतः आळा बसणार आहे.

🔹RFID (Radio Frequency Identification) चिप प्रणाली. धावण्याच्या चाचणीत शंभर टक्के अचूकता आणण्यासाठी मैदानी धाव चाचणीदरम्यान प्रत्येक उमेदवाराच्या पायाला RFID चिप स्ट्रॅपद्वारे सुरक्षितपणे बांधली जाते. सदर RFID चिप मुळे अचूक वेळ नोंद. धाव चाचणी सुरू होताच सेन्सर प्रणालीद्वारे उमेदवाराने पूर्ण केलेल्या अंतराची सेकंदागणिक डिजिटल नोंद होते. मानवी हस्तक्षेप टाळल्यामुळे वेळ मोजण्यात कोणतीही चूक राहत नाही. फेऱ्यांची स्वयंचलित मोजणी. लांब पल्ल्याच्या धावण्यात प्रत्येक फेरीची नोंद स्वयंचलितपणे केली जाते.✔ फसवणूक प्रतिबंध. प्रत्येक RFID चिप उमेदवाराच्या विशिष्ट नोंदणी क्रमांकाशी जोडलेली असल्याने गैर प्रकारांना पूर्णतः आळा बसतो.

🔹सीसीटीव्ही व डिजिटल नियंत्रण कक्ष. भरती प्रक्रियेच्या संपूर्ण परिसरात उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाते.प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगपारदर्शकतेसाठी ठोस पुरावा उपलब्ध आहे. यामुळे प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व शंकामुक्त बनली आहे.

🔹संगणकीकृत डेटा व्यवस्थापन व त्वरित निकाल. सर्व उमेदवारांची माहिती, गुणांकन, वेळ नोंदी व निकाल पूर्णतः संगणकीकृत प्रणालीद्वारे हाताळले जातात. त्यामुळे कसल्याही प्रकारची त्रुटीची शक्यता संपवून धाव चाचणी पूर्ण होताच वेळेची त्वरित माहिती उपलब्ध होते. पारदर्शकतेचा दृढ संकल्प. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित बनवली आहे. बायोमेट्रिक ओळख प्रणाली, RFID तंत्रज्ञान, CCTV मॉनिटरिंग व संगणकीकृत डेटा व्यवस्थापन या सर्व उपाययोजनांमुळे भरती प्रक्रियेत गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसला असून लातूर पोलीस दलाची ही तंत्रज्ञानाधारित भरती प्रक्रिया भविष्यातील प्रशासनासाठी आदर्श ठरत आहे.

Previous Post

🟢 राजकारण संपले, आता समाजकारण : हुडे ता. आजरा,गावचा विकासोन्मुख आदर्श!

Next Post

SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
51
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
94
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post
SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In