• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

by
February 14, 2026
in खेळ
0
SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

रत्नागिरी | दि. ८ फेब्रुवारी २०२६ (रविवार)(प्रतिनिधी:राकेश.चिलबे)रत्नागिरी येथे पार पडलेल्या १९ व्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज पुमसे व क्युरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत SRK Taekwondo Instituteच्या सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके व एक कांस्यपदक पटकावले. जिल्ह्यातील सुमारे ७०० नामांकित खेळाडूंमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत स्वराने आपल्या कौशल्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.

रत्नागिरी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित या स्पर्धेत पुमसे व क्युरोगी या दोन्ही प्रकारांत स्वराने प्रभावी खेळ सादर केला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.स्वराने आतापर्यंत तायक्वांदो क्षेत्रात ३८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण ६१ पदके मिळवत भरीव यश संपादन केले आहे.

RelatedPosts

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि शिस्तबद्ध तयारी मुळेच हे यश शक्य झाल्याचे क्रीडा जाणकारांचे मत आहे या यशामागे तिचे प्रशिक्षक तथा अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या आई-वडिलांचे मोलाचे सहकार्य आणि पाठबळही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे.

स्वरा ही नगरपरिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. मोटे सर, क्रीडा शिक्षक श्री. शेंडगे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष श्री. व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत तसेच क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक, पालक, क्रीडा शिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी आणि समस्त पालकवर्ग यांनी स्वराच्या या यशाचे कौतुक करत भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

Next Post

सोलापूर: येथील दमानी नगर रेल्वे ब्रिजचे काम ठप्प; काँग्रेसचे मरीआई चौकात आंदोलन..

Related Posts

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
72
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
खेळ

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

March 27, 2026
9
केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय
खेळ

केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय

March 23, 2026
100
🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.
खेळ

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

March 19, 2026
12
Blog

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

March 7, 2026
105
Next Post

सोलापूर: येथील दमानी नगर रेल्वे ब्रिजचे काम ठप्प; काँग्रेसचे मरीआई चौकात आंदोलन..

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In