• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मनरेगा बचाव संग्राम केंद्र सरकारने १०० टक्के अनुदानासह मनरेगा योजना पूर्ववत सुरू ठेवावी –जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी

by
February 17, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली) :दि.१६ भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनतेच्या जीवनाधार योजना असताना, भाजप सरकारने ती मोडीत काढून तिच्या जागी VB RAM G ही नवी योजना लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी कष्टकरी नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.या लोकविरोधी, शेतकरी-मजूर विरोधी निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच मनरेगा योजना जुन्याच पद्धतीने, केंद्र सरकारच्या १०० टक्के अनुदानासह तात्काळ सुरू करण्यात यावी या ठोस मागणीसाठी “मनरेगा बचाव संग्राम” अभियानांतर्गत आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी येथे मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर उतरून भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, आरमोरी शहराध्यक्ष शालिक पत्रे, उपाध्यक्ष दिलीप घोडाम,लता ढोकरे, अक्षय बागडे, मेघा मणे, माणिकजी भोयर, प्रज्ञा निमगडे, आशिष सहारे, भजनराव उसेंडी, चंद्रशेखर टेंभुर्णे, विश्वेश्वर दररो, निकेश ताडाम, दीपक घुबडे, ईश्वर बरखडे, नीलकंठ गोहने, संदीप राऊत, बावनकर, मुन्नासिंग चंदेल, आशिष लोणारे, अमर उपरीकर, विशाल मंडलवार, रोशन लक्षणे, प्रज्वल नैताम, आकाश लोथे, प्रफुल नासवरे, भूषण चिचघरे, दीपक मडावी, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मनरेगा योजनेत काम करणारे कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, मनरेगा ही केवळ रोजगार योजना नसून ग्रामीण भारताचा जीवनाधार आहे. भाजप सरकारचा हा निर्णय गरीबविरोधी असून काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करीत राहील.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

Previous Post

सावली गावातील pvc पाईप लाईन नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कार्यवाही करा आमदार राजेश बकाणे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी

Next Post

अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा’; अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या खोक्यांवर महापालिकेने चालवला जेसीबी

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
16
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
34
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा’; अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या खोक्यांवर महापालिकेने चालवला जेसीबी

अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा'; अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या खोक्यांवर महापालिकेने चालवला जेसीबी

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In