• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
139
VIEWS
Ad 1

लोहारा प्रतिनिधी

मौजे नागूर, ता. लोहारा, जि. धाराशिव येथे मागील काही महिन्यांपासून येणाऱ्या एस.टी. बसच्या अनियमित आणि ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही उमरगा आणि लोहारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

एस.टी. बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. परीक्षांना उशीर होणे, वर्ग चुकणे तसेच शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार कै. के. वाय. जाधव (आण्णा) यांच्या प्रयत्नांमुळे पूर्वी नागूर गावासाठी एस.टी. बसचे वेळापत्रक अत्यंत शिस्तबद्ध होते. बस वेळेवर येत-जात असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र त्यांच्या निधनानंतर नागूर गावातील एस.टी. सेवेचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

या अनियमिततेमुळे ग्रामस्थांना शैक्षणिक, आर्थिक तसेच वैद्यकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य परिवहन महामंडळ करणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजता, सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता नागूर गावात एस.टी. बस येणे अपेक्षित आहे. मात्र विशेषतः रात्री मुक्कामी येणारी बस ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून एस.टी. बसचे नियोजन सुरळीत करावे, तसेच सर्व बसगाड्या वेळापत्रकानुसार चालवाव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा नागूरसह परिसरातील नागरिक मोठे जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Tags: Aditya Jadhav
Previous Post

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In