• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण; प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण मोहीम सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली असून, ३० जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटशिक्षणाधिकारी स्मिता निकाळजे, मुख्याधिकारी मनोज उकिरडे तसेच ऋषिकेश पाटील उपस्थित होते. या मोहिमेसाठी मतदारसंघातील ३११ मतदान केंद्रांवर ३११ बीएलओ आणि ३१ क्षेत्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीरामपूर मतदारसंघात एकूण ३ लाख १ हजार ४९७ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ५३ हजार २४२ पुरुष, १ लाख ५२ हजार १९४ महिला आणि ६१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघाचे सुमारे ८७ टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित भागातील दुबार, मयत तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित नागरिकांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी दिला.

तसेच सोशल मीडियावर मतदार यादी किंवा या मोहिमेबाबत कोणतीही चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती पसरवल्यास संबंधितांवर सायबर कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास थेट तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

Next Post

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In