• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा’; अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या खोक्यांवर महापालिकेने चालवला जेसीबी

by
February 17, 2026
in देश विदेश
0
अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा’; अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या खोक्यांवर महापालिकेने चालवला जेसीबी
0
SHARES
13
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

गेली कित्तेक वर्षांपासून हार्ट ऑफ सिटी अशी ओळख असणाऱ्या विश्रामबाग परिसरातील सांगली मिरज रस्त्यावरतील ३६ अनधिकृत खोक्यांवर अखेर आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती मध्ये जे सी बी चालवला गेला आणि या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसार, आज विश्रामबाग चौक (जुना जकात नाका) व दांडेकर बझार समोरील अनेक वर्षांपासून असलेले ६७ अनधिकृत खोक्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.सदर अतिक्रमण हटवण्यापूर्वी नगररचना विभागातर्फे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. उपायुक्त (सा.प्र.) श्रीमती अश्विनी पाटील यांच्या मागदर्शना खाली सहाय्यक संचालक नगररचना श्री. हणमंत मारनूर यांच्या पथकाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील विविध कलमान्वये संबंधित सर्व ६७ खोकी धारकांना पूर्वसूचना (नोटीस) बजावली होती. विहित मुदतीत अतिक्रमण न हटवल्यामुळे आज प्रशासकीय बळाचा वापर करून ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील ,अधीक्षक अतिक्रमण निर्मूलन मद्रासी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश मिरजकर यांच्या पथकांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यासोबतच महापालिकेचे इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अनेक वर्षांपासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली-मिरज मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. हे अतिक्रमण हटवल्याने रस्ता रुंद झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या या धाडसी भूमिकेचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. यावेळी आयुक्त सत्यम गांधी म्हणाले “शहराच्या नियोजित विकासात आणि वाहतुकीच्या प्रवाहात अनधिकृत बांधकामे हा सर्वात मोठा अडथळा आहे. यापुढेही सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे कोणत्याही दबावाशिवाय हटवली जातील. नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये, अन्यथा जप्ती व फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल.” ज्या अनधिकृत बांधकामांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे; अन्यथा महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या निष्कासनाचा खर्च संबंधित मालकांकडूनच वसूल केला जाईल आणि बांधकामाचे साहित्य व मशिनरी जप्त केली जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

मनरेगा बचाव संग्राम केंद्र सरकारने १०० टक्के अनुदानासह मनरेगा योजना पूर्ववत सुरू ठेवावी –जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी

Next Post

गारगोटी येथे ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन उत्साहात; साहित्यिकांनी ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे यावे – डॉ. चंद्रशेखर कांबळे

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
गारगोटी येथे ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन उत्साहात; साहित्यिकांनी ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे यावे – डॉ. चंद्रशेखर कांबळे

गारगोटी येथे ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन उत्साहात; साहित्यिकांनी ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे यावे – डॉ. चंद्रशेखर कांबळे

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In