• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मराठा गौरव सन्माननीय युवराज (भाऊ) काशिद, सरपंच अजय (दादा) काशिद, मकरंद (आबा) काशिद तसेच केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी सन २०२६ च्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारे सारोळा शाळेचे गुणवंत विद्यार्थी साक्षी गोवर्धन मुळे, पूनम राम जगदाळे आणि पवन दादासाहेब जगदाळे यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ७,५०० रुपये प्रमाणे एकूण १५,००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत १३ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले, तर NMMS परीक्षेत ११ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला. या उल्लेखनीय यशाबद्दल इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक राहुल लिमकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत १५ विद्यार्थी पात्र ठरल्याबद्दल वर्गशिक्षिका अमृता रसाळ यांनाही गौरविण्यात आले.

सारोळा शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा राजुरी केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब यांचाही सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सारोळा शाळेच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता पॅटर्नचे कौतुक करत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, पालक गोवर्धन मुळे, राम जगदाळे, दादासाहेब जगदाळे, अंगद चव्हाण, मुख्याध्यापक संदीप भालसिंग, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे, उपाध्यापक प्रशांत होळकर, उपाध्यापिका शबाना शेख, वृषाली खांदवे, अमृता रसाळ तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

Next Post

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
14
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
19
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
22
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In