14 Total Views , 1 views today
महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्शवभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज मुंबई आणि पुण्यात अतीमुसळधार पावसाचा अंदाज वरतविण्यात आला असून. पालघर आणि मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.पावसामुळे काही जिल्ह्यामधे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अवशकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागाकडून कऱण्यात आल आहे. हवामान विभागाकडून कोकणात देखील अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि पालघर या दोन जिल्याना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे नंदुरबार.नाशिक.धुळे.पुणे.ठाणे या जील्हांना हवामान विभागाकडून पावसाचा आरेंज अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात ही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये बीड. परभणी. हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलडाणा. अकोला. अमरावती.यवतमाळ.नागपूर.गोंदिया.वाशिम.चंद्रपूर या जिल्ह्यामधे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Discussion about this post