• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन

by
February 21, 2026
in Blog, देश विदेश
0
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन
0
SHARES
481
VIEWS
Ad 1

राजुरा ( प्रतिनिधी – आकाश गेडाम):

आदिवासी टायगर सेना, राजुरा यांच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठोस भूमिका घेऊन विषय मंजूर करून घ्यावेत, अशी मागणी देवरावदादा भोंगळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजना व अनुदानामध्ये वाढ करून लाभार्थ्यांना अधिक निधी द्यावा, जेणेकरून राज्यातील लाखो आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

  1. आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या घरकुल (आवास) योजनेत सध्या दिला जाणारा १.५० लाख रुपयांचा निधी वाढवून किमान ५ लाख रुपये करावा.
  2. न्यूक्लियर बजेट (एनबी) अंतर्गत वैयक्तिक व सामूहिक योजनांतील निधीत वाढ करावी. सध्या ५० हजार रुपयांची अर्थसहाय्य योजना अपुरी ठरत असून त्यातून रोजगारनिर्मिती होत नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
  3. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र व समाज कल्याण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास शबरी महामंडळाच्या योजनांमध्येही गरजू लाभार्थ्यांना अनुदान (सबसिडी) द्यावी.
  4. आदिवासी विकास महामंडळाच्या योजनांचा लक्षांक वाढवून अधिकाधिक गरजू व होतकरू आदिवासी बांधवांना लाभ मिळावा.
  5. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
  6. आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती वेळेत वितरित करावी. सत्र संपण्यापूर्वी शिष्यवृत्ती मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सर्व मागण्या मांडून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर आमदारांनाही अशाच प्रकारचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, विदर्भ युवा अध्यक्ष अभिलाष परचाके, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख आकाश गेडाम, युवा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र आत्राम, नगरसेवक भूपेश मेश्राम, विदर्भ सचिव विश्वेश्वर मडावी तसेच दशरथ कुळमेथे, भाऊजी किन्हाके, निखिल रांझीकर, शैलेश सिडाम, सुखदेव मडावी, राकेश कोडापे, सुभाष कुमरे, गणेश कोडापे, बाळकृष्ण किन्हाके, नट्टू खंडाते, सुशील मडावी, प्रमोद कुमरे आदी उपस्थित होते.

Tags: Akash Gedam
Previous Post

🔴मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांना तेली समाज उन्नती मंडळ,सिंधुदुर्ग यांच्याकडून आर्थिक व गृह उपयोगी वस्तूंची मदत 🔴

Next Post

मिरजेत आज ‘आभाळाचे रंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन; जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य 

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
मिरजेत आज ‘आभाळाचे रंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन; जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य 

मिरजेत आज 'आभाळाचे रंग' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन; जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य 

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In