• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाची मदत; मंत्रालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

by
February 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाची मदत; मंत्रालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कणकवली तालुका (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्हा येथील आंबा बागायतदारांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावर्षी वातावरणातील बदलांमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून जिल्ह्यातील आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान यापूर्वी कधीही झाले नव्हते. आंबा पिकांवर मोहोर न आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पुढील काळात अवेळी पाऊस किंवा तीव्र उष्णता वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आंबा पिकावरील परिस्थिती नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक अहवाल सादर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशा सूचना देण्यात आल्या.

बैठकीस तृप्ती धोडमिसे (जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग), डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चे उपकुलगुरू संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, संशोधन संचालक डॉ. व्ही. यू. शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागप्रमुख डॉ. पुष्पा पाटील, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच जिल्ह्यातील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासन लवकरच ठोस निर्णय घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य: अपघातांना निमंत्रण

Next Post

खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In