• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीतील पाणी टंचाई विरोधात स्त्री शक्ती फाउंडेशन चा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….

by
February 23, 2026
in Blog
0
कळंबोलीतील पाणी टंचाई विरोधात स्त्री शक्ती फाउंडेशन चा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….
0
SHARES
106
VIEWS
Ad 1

पनवेल -कळंबोली ता.प्रतिनिधी : पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली प्रभाग ८ येथील के एल ४, सेक्टर- 4ई परिसरातील भागात ८ दिवसापासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला असून शेकडो कुटुंबांवर अक्षरशः पाणीबाणी ओढवली आहे.लोकांना जेवणासाठी,पिण्यासाठी तसेच बाथरूम व दैनंदिन कामासाठी देखील पाणी उपलब्ध नाही. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणे ही प्रशासनाची गंभीर चूक असून या मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे.वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आणि त्याचे रूपांतर आज मोर्चा मध्ये झाले.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ विजया कदम यांनी थेट सिडकोच्या पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल देवरे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली. “८ दिवसापासून केएल–४ मध्ये पाणी नाही, तरी प्रशासन झोपेत आहे का? आज पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत इथेच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला. या वेळी उपमहापौर सौ प्रमिला पाटील यांनी देखील ठणकावून सांगितले कळंबोली तील नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे. या संदर्भात पनवेल महापालिका सिडको अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कळंबोलीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे या साठी प्रयत्न करण्यात येईल. जो पर्यंत पाणी पुरवठा सुरू होत नाही तो पर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून तेथील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याच्या टँकर ची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या वेळी सिडको पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्री प्रफुल देवरे यांनी माहिती दिली की सेक्टर -४ इ येथील पाईप लाईन मध्ये पाण्याच्या बॉटल, बॉल सदृश वस्तू व व्हॉल्व चे काही भाग अडकल्यामुळे पाणी पुरवठा बंद होता, आज संध्याकाळ पर्यंत आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले.

आजचा हा मोर्चा आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र अध्यक्षा सौ विजया कदम, उपमहापौर सौ. प्रमिला ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री रविनाथ पाटील, श्री. गणेश लाड, श्री तुकाराम तरसे(सेक्रेटरी,सुविधा सोसायटी),श्री शरद मोहिते, श्री निखिल कारेकर( खजिनदार, सुविधा सोसायटी), श्री.राम पवार , श्री.विलास पाटील सर,सौ मीना जांबुरने, स्वाती राळे , पुष्पां राळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे “व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन*

Next Post

बंजारा आरक्षणाचा सवाल; आमदारांवर लखन चव्हाणांचा थेट हल्लाबोल!

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
20
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
31
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
7
Next Post
बंजारा आरक्षणाचा सवाल; आमदारांवर लखन चव्हाणांचा थेट हल्लाबोल!

बंजारा आरक्षणाचा सवाल; आमदारांवर लखन चव्हाणांचा थेट हल्लाबोल!

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In