• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरगव्हाण बुद्रुक येथे एचडीपीएस कापूस व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तूर लागवड तंत्रज्ञानाची पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके यांचे शेतकऱ्यांना आधुनिक पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

पाथरी | प्रतिनिधी

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

पाथरी तालुक्यातील मौजे पाथरगव्हाण बुद्रुक येथे सघन कापूस लागवड (HDPS) तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तूर लागवड तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक क्षेत्राची प्रकल्प उपसंचालक (आत्मा) परभणी श्री. अभिषेक घोडके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

श्री. गणेश घांडगे व श्री. बळीराम घांडगे यांच्या शेतामध्ये उभारण्यात आलेल्या सघन कापूस लागवड (HDPS) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तूर लागवड प्रात्यक्षिकांची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी श्री. गोविंद कोल्हे यांनी आधुनिक लागवड पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पीक निरीक्षण, अचूक व्यवस्थापन आणि त्यातून होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी प्रकल्प उपसंचालक श्री. अभिषेक घोडके यांनी पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, योग्य सिंचन पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती अधिक उत्पादक, किफायतशीर आणि शाश्वत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

या पाहणी दौऱ्याला मंडळ कृषी अधिकारी श्री. पांडुरंग गोरे, उपकृषी अधिकारी श्री. बी. यू. शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. ओंकार लबडे, बीटीएम श्री. रमेश इक्कर, बीटीएम श्री. विशाल दलाल तसेच एटीएम श्री. रमेश शिरस उपस्थित होते. याशिवाय श्री. कोंडीराम घांडगे, श्री. दिनेश घांडगे आणि परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली.

Previous Post

विभूतीचंद्र गजभिये यांच्या संपादन कार्याची साहित्यविश्वात दखल

Next Post

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In