• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध.

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Ad 1
Ad 1

लातूर प्रतिनिधी – पोलिस अधीक्षक कार्यालय, लातूर प्रेस नोट

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने कठोर आणि नियोजनबद्ध कारवाया करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आळा बसावा व समाजात कायद्याचा धाक निर्माण व्हावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावर विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहेत.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

त्याच अनुषंगाने लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार १)अमोल ज्योतीराम गंभीरे (वय २६ वर्षे, रा. सिकंदपूर ता. जि. लातूर) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (एमपीडीए) अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.सदर आरोपी हा सवयीचा व धोकादायक गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस ठाणे शिवाजीनगर लातूर, एमआयडीसी लातूर, विवेकानंद चौक लातूर तसेच गांधी चौक लातूर येथे खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारी यांसारख्या गुन्ह्यांसह एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तब्बल १३ गुन्हे हे शरीराविरुद्धचे तर २ गुन्हे मालमत्तेविरुद्धचे आहेत. याशिवाय पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे ०४ अदखलपात्र नोंदी करण्यात आलेल्या आहेत. आरोपीच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

सदर बाबीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कक्षामार्फत आरोपीविरुद्ध माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण श्री. नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे लातूर ग्रामीण श्री. अरविंद पवार यांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लातूर यांच्याकडे सादर केला.सदर प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लातूर यांनी अमोल ज्योतीराम गंभीरे यास दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी एक वर्ष कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर आरोपीस ताब्यात घेऊन आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व पुढील कालावधीसाठी त्यास मध्यवर्ती कारागृह, हार्सूल रोड, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात सपोनि श्री. डोंगरे, पोउपनि श्री. बी. के. मोरे, पोलीस अंमलदार महेबूब तांबोळी, बालाजी यादव, वाजिद चिकले, नितीन पाटील, दाजीबा यादव, अंबादास पारगावे, संतोष थोरात, सुदर्शन पाटील व मुकेश कोळी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लातूर जिल्हा पोलीस दलाचे कार्य तत्पर, काटेकोर व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Ad 1
Previous Post

अँड.अजित काळे यांचा भव्य सत्कार सोहळा

Next Post

पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर संतप्त

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
4
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
54
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
41
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post
पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर संतप्त

पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर संतप्त

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In