• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर संतप्त

by
February 27, 2026
in Blog
0
पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर संतप्त
0
SHARES
49
VIEWS
Ad 1
Ad 1

“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई येथील विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात सुरू असलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान संबंधित मंत्र्यांची अनुपस्थिती आढळून आल्याने बबनराव लोणीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, नियोजन विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री आणि प्रधान सचिव सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

मतदारसंघाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले जात असताना जबाबदार मंत्रीच गैरहजर राहणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, “सभागृहाचा सगळा कारभार रामभरोसे चाललाय,” असा उपरोधिक टोला लोणीकर यांनी लगावला. पुरवणी मागण्या या केवळ आकडेवारी नसून त्या सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांशी निगडित असतात. त्यामुळे संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

परतूर मतदारसंघासाठी ठोस मागण्या

परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडताना लोणीकर यांनी पुढील मागण्या केल्या—

  • ➡️ रास्त भाव दुकानदारांचे मार्जिन महागाईनुसार किमान ३०० रुपये प्रति क्विंटल वाढवावे.
  • ➡️ वाटुर–जयपूर–सरकटे–वझर, तळणी–देवठाणा–उसवद–मंठा–विडोळी–पाटोदा तसेच विरेगाव–नेर–सेवली–भागडे–सावरगाव ते जिल्हा सरहद्द या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी तातडीने मुबलक निधी द्यावा. या रस्त्यांमुळे सुमारे १३० गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • ➡️ मंठा व परतूर उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५० कोटी, एकूण १०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करावा.

मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि व्यापारी घटकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत लोणीकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.

Ad 1
Previous Post

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध.

Next Post

अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोलाअधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले
“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
255
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post

अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोलाअधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले
“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In