• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विकासाच्या गप्पा नकोत — कृती हवी!

by
February 28, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

वाशिम शहरातील काटा रोड ते पाटणी चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले असून रस्त्याची पृष्ठभाग पूर्णपणे उखडलेली आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, व्यापारी व सर्वसामान्य वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न होणे ही गंभीर बाब आहे.
यामुळे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती अधिकच बिकट होते. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व पाटणी चौक येथील ट्राफिक सिग्नल अनेक दिवसांपासून नीट कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सिग्नल बंद किंवा बिघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीत गोंधळ उडत आहे व अपघातांचा धोका वाढला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशी निष्क्रिय व्यवस्था असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
नगरपरिषद प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर तात्काळ आणि ठोस निर्णय घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, याची नोंद घ्यावी.
म्हणूनच वाशिम नगरपरिषद प्रशासनाने काटा रोड ते पाटणी चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मजबूत डांबरीकरण करावे तसेच संबंधित चौकांमधील ट्राफिक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, ही जनतेची ठाम मागणी आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड मान्य नाही!

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

Ad 1
Previous Post

भादवण हायस्कूलमध्ये प्रयोगांतून उमलला विज्ञानाचा आविष्कार; ४२ प्रयोगांचे विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण

Next Post

देवई येथे भव्य डे – नाईट कब्बडी (पुरुष) सामन्याचे उद्घाटन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
देवई येथे भव्य डे – नाईट कब्बडी (पुरुष) सामन्याचे उद्घाटन

देवई येथे भव्य डे - नाईट कब्बडी (पुरुष) सामन्याचे उद्घाटन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In