“नायगाव तालुका प्रतिनिधी…दिपक गजभारे घुंगराळेकर..फुले.शाहु.डॉ.आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन गेल्या अनेक दिवसा पासून सबंध महाराष्ट्रामध्ये “धाडस” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरददादा कोळी यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवकांना सोबत घेऊन सामाजिक संघटनेचा चंग बांधला असून दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी शिवाजी कुंटूरकर यांच्या संपर्क कार्यालयात विभागीय अध्यक्ष गजानन पाटील काळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शिवाजी कुंटूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
बहुजन अल्पसंख्यांक वंचित समाजाच्या सामूहिक हिताचे प्रश्न प्रशासनाच्या समोर ठेवून वंचितांना न्याय देण्यासाठी ही संघटना गेल्या चार वर्षापासून सबंध महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून शरद दादा कोळी यांच्या आक्रमक भूमिकेने सबंध महाराष्ट्राला एक वैचारिक विचाराचा वारस मिळाल्या असल्याचे विभागीय अध्यक्ष गजानन तळेकर यांनी विचार व्यक्त करत असतानां आपली भूमिका मांडली यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील मागावे.
दिलीप पाटील महागावे. सतीश माकने. मुखेड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम. जिल्हा कार्याध्यक्ष इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी नायगावच्या तालुका उपाध्यक्षपदी शेख अमर लाला तर शहराध्यक्षपदी शेख.
निजाम नबीसाब. तर नायगाव तालुका महिला आघाडीच्या आशिया शेषराव डुमणे. यांची निवड करण्यात आली व त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवाजी कुंटूरकर यांनी केले तर संचलन अनिल सोनकांबळे यांनी केले व आभार शेख निजाम यांनी मांडले….
Discussion about this post