नरेश मोरे (७०३९४९८६९९)परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन भूमीत वसलेले कोकण म्हणजे स्वर्ग जणू भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे वेध लागते गणरायाच्या आगमनाची कोकणची अनेक वर्षांपासून परंपरा जपत कामानिमित्ताने चाकरमानी मुंबई,पुणे अशा अनेक ठिकाणी विखुरलेले असले तरी गणपती उत्सवाला आपल्या मुळगावी कोकणात येणारच गणरायाच्या स्वागतासाठी तयारी निसर्ग रम्य मखर,आरास सजावट करत वेगवेगळ्या विषयांवर चलचित्र, देखावा साकारत सामाजिक संदेश त्यातून दिला जातो.
अशीच प्रथा कोकणातील परंपरा अबाधित ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आमच्या गाव तवसाळ तांबडवाडी मधील गणरायाचे स्वागत ढोल ताशा वाजवत घरोघरी आगमन करण्यात आले.गणरायाची प्रतिष्ठापना करून ढोळकी,झांज, टाळ, मृदुंग अशा वाद्यांच्या साथीने आरती करण्यात आली, केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला कि श्रावणचा उपवास सोडला जातो, दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी निमित्ताने वाडीतील मुख्य ठिकाणी जागर म्हणून जाकडी नृत्य (बाला डांन्स) पुरुष वर्ग आणि महिला यांचा नाच होतो. पुढे गौरीई आगमन पारंपरिक पद्धतीने तवसाळ तांबडवाडी वाडीतील पाण्याचं मुख्य प्रवाह असेलेल्या (तळी) येथे विधीवत पुजा करुन सर्व ग्रामस्थ महिला युवा युवती सोबत ढोल ताशा वाजवत महिला पाणवठ्यावर शेजारी गौराईला विनवणी फेर्यांची गाणी फेर धरून नाचल्या नंतर गौराई घरोघरी स्वागत करत सोबत आणलेल्या तेरडा, सोनवळी फुल झाडे यांची लाकडी खुर्चीला मुखवटा बांधून नऊ वारी साडी नेसून, तर हातापायाची गौवराईचा साज शृंगार सजावट पहायला मिळते,गौराई पुजनाची तयारी करण्यात आली, नविन लग्न झालेल्या नवरीचे ( होवसा ) पुर्वा नक्षत्र असेल तर हि पुजा केली जाते, यावर्षी योग जुळून आला होता हि प्रथा अजूनही कोकणात आबादीत आहे, तस गौरी सोबत पाठिराखा शंख्रोबा पहायला मिळतो. सर्वांना होवसा काडकाडीच्या पानावर पाणाचाविडा,सुपारी, खोबरे ,फळ प्रसाद करून सौभाग्यच वान पुरुषांना मान दिला जातो. खास मौसाहारी नैवेद्य दाखवून गौईचा पुजाला गोडधोड पदार्थ दाखविला, तसेच रात्री उशिरापर्यंत प्रत्येक घरात गौरी गणपती जागर उत्सव म्हणून जाकडी न्यृत्य (बाला डांन्स) महिलांचा टिपरी नाच वरती ठेका धरुन मनोरंजन करत रात्र जागवली जाते. यावर्षी आमच्या तवसाळ तांबडवाडी घरगुती गणपती, गौरी गणपती ३२ तर १० अनंत चतुर्थीला होते, कोकणात गणपती विसर्जन पाच दिवस आणि अनंत चतुर्थी याच दिवशी जास्त प्रमाणात करण्यात येतात.
खास वैशिष्ट्ये म्हणजे कोकणातला गणेशोत्सव गावातील विसर्जन मिरवणूकीत पोलिस बंदोबस्त करावा लागत नाही. ढोल ताशांच्या बॅन्जो चा बेधुंद होऊन तालावर नाचत गाजत मिरवणूकचा उत्साह शिगेला पोहोचला नंतर शेवटच्या टप्प्यात जाकडी नृत्य व आरती करत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणराया तुझ्या आगमनाने कोकणची भूमी प्रसन्न झाली तुला निरोप घेताना अश्रू अनावर झाले म्हणून साद घालत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या भक्ती भावाने निरोप घेत समारोह झाला.
Discussion about this post