• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत शहरातील ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार – उपनगराध्यक्ष विक्रम ताड

by
March 5, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश
0
जत शहरातील ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार – उपनगराध्यक्ष विक्रम ताड
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

जत :(तालुका प्रतिनिधी)
जत शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी तसेच नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने शहरातील शासकीय ओढापात्रातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार असून त्या जागेवर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी दिली.

जत नगरीचे ग्रामदैवत श्री यल्लमा देवी मंदिर परिसरात आयोजित नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त झालेल्या सत्कार समारंभात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी शहर विकासासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. शहरातील शासकीय ओढापात्रातील सर्व खोक्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करून त्या जागेचा विकास करण्यात येणार असून त्या ठिकाणी आधुनिक आणि भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

या विकासकामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, मग तो कोणताही व्यक्ती असो, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ओढापात्रातील अतिक्रमण हटवून त्या जागेचा सुयोग्य विकास केल्यास जत शहराच्या सौंदर्यात व वैभवात मोठी भर पडणार आहे. तसेच उभारण्यात येणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी व्यवसायासाठी जागा उपलब्ध होणार असून नगरपरिषदेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहराच्या विकासाची डिजिटल झलक मतदारांना दाखवली होती. त्यामध्ये शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, सर्व उद्यानांचा विकास, भूमिगत बंदिस्त गटार योजना, रस्त्यांचे मजबुतीकरण अशा विविध विकासकामांची आश्वासने देण्यात आली होती. या सर्व कामांची पूर्तता नजीकच्या काळात नागरिकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार असल्याचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी सांगितले.

मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन शहराच्या विकासाला व उत्पन्न वाढीला प्राधान्य देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जत शहरातून जाणाऱ्या शासकीय ओढापात्राच्या दोन्ही बाजूंना सुमारे 30 मीटर अंतरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ओढापात्रातील सर्व अतिक्रमणे हटवून त्या जागेचा नियोजनबद्ध विकास करत आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुडे यांनीही नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जत शहरातील ओढापात्र सुशोभीकरणासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली होती. जतचे आमदार गोपीचंद पडळकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र अरळी व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने हे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण केले जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी सांगितले.

जत शहराच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असून शहराच्या सौंदर्याबरोबरच आर्थिक बळकटीसाठीही तो फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

नागरिकांमधून नाराजीचा सूर “सत्कार सोहळे, हार-तुरे पुरे, आता कामाला लागा!”

Next Post

रिसोड: नगर परिषदेच्या पाणीपुरवहा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती संजय बगडिया यांनी तातडीने गजानन नगर परिसरात भेट देऊन पाहणी केली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

Related Posts

ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
16
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र बंदला पाथरीत उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठा दिवसभर बंद

July 23, 2026
6
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पाथरी बंदचे आवाहन; प्रशासनाला निवेदन

July 23, 2026
2
Next Post

रिसोड: नगर परिषदेच्या पाणीपुरवहा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती संजय बगडिया यांनी तातडीने गजानन नगर परिसरात भेट देऊन पाहणी केली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In