• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर ध्वजारोहण; त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा

नाशिक

RelatedPosts

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय प्रारंभ झाला. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पंचवटीतील रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. दोन्ही तीर्थक्षेत्रांवर एकाच शुभमुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यामुळे नाशिकच्या धार्मिक इतिहासात महत्त्वपूर्ण क्षणाची नोंद झाली.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा

पंचवटीतील रामकुंड परिसरात ध्वजारोहणासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभ पूजन, ध्वजपूजन आणि निर्धारित शुभमुहूर्तावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, जयकुमार रावल, संजय सावकारे, नरहरी झिरवाळ, नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे आणि डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

नाशिकच्या रामकुंडावर ध्वजारोहण होत असतानाच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावरही धर्मध्वजाचे पूजन आणि आरोहण करण्यात आले. दक्षिण शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत हा धार्मिक विधी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण सोहळ्यात सहभाग घेतला.

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ आणि परिसरातील रस्ते भगव्या पताका, फुलांच्या माळा आणि आकर्षक सजावटीने सजवण्यात आले होते. साधू-महंत आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

भव्य ध्वजस्तंभांनी वेधले लक्ष

रामकुंड परिसरात ५१ फूट उंचीचा मुख्य धर्मध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्यासाठी पंचधातूंचा वापर करण्यात आला आहे. तर त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभाला ६२ किलो पितळाचा मुलामा देण्यात आला आहे.

गोदावरी नदीकाठचा परिसर, मंदिरे आणि प्रमुख रस्ते फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. अवघी नाशिक नगरी भगव्या ध्वजांनी आणि पताकांनी सजली होती.

तीन दिवसीय धार्मिक विधींना प्रारंभ

३० ऑक्टोबरपासून गोदावरीच्या तीरावर तीन दिवसीय विशेष यज्ञ आणि धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. १ नोव्हेंबर रोजी श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामीजी यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती होणार आहे.

कुंभपर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपतींची उपस्थिती हा नाशिकच्या धार्मिक इतिहासातील विशेष क्षण ठरला. नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपतींच्या हस्ते आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकाच शुभमुहूर्तावर झालेल्या ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभपर्वाच्या धार्मिक सोहळ्यांना उत्साहात सुरुवात झाली.

Ad 1
Tags: Sayyad Mohammad
Previous Post

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

Next Post

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

Related Posts

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!
ताज्या घडामोडी

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

October 31, 2026
7
ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!
ताज्या घडामोडी

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

October 31, 2026
0
ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

October 31, 2026
10
खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
ताज्या घडामोडी

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

October 31, 2026
3
हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन
ताज्या घडामोडी

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

October 31, 2026
4
हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
2
Next Post
ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

ताज्या बातम्या

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

October 31, 2026
ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

October 31, 2026
सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण

सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In