• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागरिकांमधून नाराजीचा सूर “सत्कार सोहळे, हार-तुरे पुरे, आता कामाला लागा!”

by
March 5, 2026
in ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राजकीय
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन आता तब्बल महिना उलटून गेला आहे. महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर तसेच विविध विषय समित्यांच्या निवड प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांचा विविध ठिकाणी सत्कार समारंभ आणि अभिनंदन कार्यक्रमांचा सिलसिला अजूनही सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मात्र आता नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. “सत्कार समारंभ पुरे, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा.” असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. निवडणुकीच्या काळात पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, नालेसफाई, स्ट्रीट लाईट्स, तसेच वाढती अनधिकृत बांधकामे यांसारखे प्रश्न प्रमुख होते. अनेक प्रभागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांबाबत तक्रारी कायम आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीत दिलेली आश्वासने आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे.

काही भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. तसेच पाणीपुरवठा नियोजन आणि कचरा निर्मूलन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. “आम्ही विश्वासाने मतदान केले आहे. आता आमच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक सामाजिक संघटनांनीदेखील नव्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन नागरिकांच्या अडचणी ऐकाव्यात आणि कामांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही नगरसेवकांनी लवकरच प्रभागभेटी घेऊन कामांची प्राधान्यक्रम यादी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या काही आठवड्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करून विकासाची गती वाढवणे, ही नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं समोरील खरी कसोटी ठरणार आहे.

Previous Post

पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला……..

Next Post

जत शहरातील ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार – उपनगराध्यक्ष विक्रम ताड

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
जत शहरातील ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार – उपनगराध्यक्ष विक्रम ताड

जत शहरातील ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार – उपनगराध्यक्ष विक्रम ताड

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In