• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१ किमीची अट अन्यायकारक; आरटीई च्या 25 टक्के प्रवेशापासून ग्रामीण गरीब वंचित राहणार – आजाद समाज पक्षाचा आक्षेप

by
March 6, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली ): दि.६ मार्चशिक्षणाचा हक्क कायदा, २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय काढून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी एक नवीन अट घातली आहे. या अटीनुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून १ किलोमीटर परिसरातीलच शाळा निवडता येईल, अशी सक्ती करण्यात आली आहे. मात्र, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत लावण्यात आलेली १ किलोमीटर अंतराची अट ही ग्रामीण व दुर्गम भागातील लाभार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत आजाद समाज पक्षाने तीव्र विरोध करत अट रद्द करण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी निवेदन देताना पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, प्रो. नरेश मोहुर्ले, नितीन दुर्गमवार उपस्थित होते.ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये १ किलोमीटरच्या परिसरात कोणतीही शाळा उपलब्ध नाही. काही ठिकाणी शाळा तर 10 किलोमीटर अंतरावर आहेत. अशा परिस्थितीत 1 किमीची सक्तीची अट लावल्यास गरीब व गरजू पालकांची मुले आरटीईच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणाचा मूलभूत हक्कच हिरावून घेण्याचा हा प्रकार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी म्हटले आहे.दुसऱ्या बाजूला विशेष म्हणजे शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्या कडून ॲड. बोधी रामटेके व ॲड. दीपक चटप यांनी न्यायालयात महत्वपूर्ण युक्तिवाद केला.माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला खडेबोल सुनावले. राज्यातील जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले. काही शाळांमध्ये तर साधे छप्परही नसल्याचे, तसेच अनेक ठिकाणी शिक्षक आणि मूलभूत सोयीसुविधांची कमतरता असल्याचे अधोरेखित करण्यात आले. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांच्या व्यवस्थेत सुधारणा न करता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा उपलब्ध असलेला पर्यायी मार्गही कसा बंद करता येईल, असा सवाल न्यायालयाने राज्य शासनासमोर उपस्थित केला.आरटीई अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च असल्याने, ९ मार्च पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. हा निर्णय रद्द झाल्यास महाराष्ट्रातील वंचित घटकांतील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

Previous Post

तुकाराम महाराज बीज निमित्त भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
9
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
31
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
11
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
4
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In