कडा प्रतिनिधी.संजय भोजने
गेल्या आठवड्यापासून आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे बिबट्याने काही शेळ्यांची शिकार केली या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. याबाबत वनविभागाच्या टिमने तत्परतेने दखल घेत या परिसराला भेट दिली शेतकऱ्यांशी संवाद साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे यांच्या आदेशानुसार वनविभागाची टीम तेथे तात्काळ आली त्यांनी ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव आहे त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आले त्यावेळी वनपाल मोहोळकर ,वनरक्षक विधाते मॅडम,काळे ,आरगाडे पंदलवाड ,शिंदे तसेच वनमजूर कानिफ पवार,शकील शेख, अशोक पाथरकर उपस्थित होते तसेच शेतकर्यांनी आपल्या शेतीची कामे करत असताना आपली चाहूल प्राण्याला लागेल .
असे मोबाईलची गाणी मोठ्या आवाजात लावावित. रात्रीची शेतकामे करताना सोबत काठी, आणि टॉर्च बाळगावी,आपल्या शेतीची कामे करत असताना शेतकऱ्यांनी सावधान रहावे तसेच
पुरेसे खाद्य व राहण्या-योग्य वातावरण मिळाले, तर बिबट्या गावाजवळ राहू शकतो.
पाळीव कुत्रे, बकऱ्या व डुकरे बिबट्याला वस्तीकडे आकर्षित करतात. स्वतःचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना बंदिस्त गोठ्यामध्ये ठेवावे. गावाजवळ बिबट्याचा वावर कमी करण्यासाठी लोकांनी
गाव स्वच्छ ठेवले तसेच कचऱ्यामुळे येणाऱ्या मोकाट कुत्रे व डुकरांची संख्या कमी होईल त्यामुळे गावाजवळ बिबट्याचा वावर कमी होईल असे वनरक्षक श्रीमती विधाते यांनी सांगितले.
Discussion about this post